शीतल म्हात्रेकडून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो शेअर; जाणून घ्या यामागे नेमकं काय कारण!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नते रविकांत वरपे यांनी काल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्यावर राज्याभरातून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या होत्या. तसेच त्या फोटोवर स्वा:ता श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा खुलासा केला होता. तसेच विरोधकांवर जोरदार यावेळी टीका सुद्धा केली होती. मात्र आता पुन्हा एकदा असाच फोटो शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला शेअर केला आहे.
शितल म्हात्रे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एक फोट आपल्या ट्टिट अंकाऊटवरुन शअर करत एक प्रश्न विचारला आहे. त्या म्हणाल्या की, बघा कोण कोणत्या खुर्चीत बसले आहे. आता या फोटोवरुन वाद होण्याची शक्यात आहे. तसेच राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते सुद्धा याला काय उत्तर देतात हे बघण सुद्धा महत्वाचे आहे.
हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? pic.twitter.com/8UUb5VzMQR
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 23, 2022
प्रवीणकुमार बिरादार यांनी ट्विट केला ओरिजनल फोटो
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात ट्विट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे. एवढंच नाही तर शिंदे गटावर टीकाही केली आहे. वाण नाही पण गुण लागला,शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा.
वाण नाही पण गुण लागला 🤦♂️
शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे.
हा घ्या पुरावा 👇 https://t.co/1ZiAKIAeyA pic.twitter.com/9gN1mVoZL6
— Pravinkumar Biradar (@PravinIYC) September 23, 2022
श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
श्रीकांत शिंदे म्हणाले, ही हास्यास्पद बाब असून विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते अशा प्रकारे काही ना काही मुद्दे उचलत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सक्षम आहेत. ते 18-18 तास काम करतात. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सुपर सीएम म्हणून काम करण्याची कोणालाही काहीही गरज नाही.