प्रेक्षकांच्या आवडत्या ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण
मुंबई: मागील 34 वर्षापासून प्रेक्षेकांना आपल्या अभिनयाच्या जोरावर हसूव ठेवण्याचे काम “अशी ही बनवा बनवी” या चित्रपटाने केले आहे. आजवरचा सर्वात विनोद चित्रपटा पैकी एक चित्रपट आहे. आजच्या दिवशीच हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि एका इतिहासाची नोंद झाली. अनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित नसतं आपण जे करतोय ते इतकं मोठ्ठं आहे की त्याची नोंद पुढे इतिहासात घेतली जाईल.
‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाची मूळ कथा हृषीकेश मुखर्जी निर्मित, हिंदी चित्रपट बिवी और मकान मधून घेतलेली आहे. मराठी भाषेतील ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाच्या यशानंतर 1991 मध्ये तेलुगू भाषेत चित्रम भल्लारे विचित्रम, तर कन्नड भाषेत 2003 मध्ये ओलू सार बारी ओलू या नावाने प्रदर्शत झाला आहे. तसेच 2009 मध्ये हिंदी भाषेत भाषेत पेईंग गेस्ट म्हणून तर 2014 मध्ये पंजाबी भाषेत Mr & Mrs 420 आणि 2017 मध्ये बंगाली भाषेत जिओ पगला अशा नावांनी पुनर्निर्मित झाला आहे.
या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि सिद्धार्थ राय या चौघांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपट पाहताना हसून हसून तुमचा जबडा दुखेल पण विनोद काही थांबणार नाही. अशा या सुपरहिट चित्रपटाला आज 34 वर्ष पुर्ण झाली आहेत. 23 सप्टेंबर 1988 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
अशी ही बनवाबनवी चित्रपटात असे अनेक डायलॉग आहेत जे आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. चित्रपटात लक्ष्मीकांत आणि सचिन पिळगावकर स्त्री वेशभूषा करुन खोली बघायला जातात. ज्यामध्ये अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली होती. यावेळी आपल्या पत्नीची ओळख करुन देताना अशोक सराफ यांनी हा माझा बायको पार्वती असे म्हणतात. चित्रपटातील या डायलॉगने प्रेक्षकांना प्रचंड हसवले.
तीन रुपये तिकिटावर तब्बल तीन कोटींची कमाई
व्ही शांताराम प्रोडक्शन प्रस्तुत सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट 23 सप्टेंबर, 1988 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल 3 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी या चित्रपटाचे फर्स्ट क्लास तिकीट 3 रुपये, तर बाल्कनी तिकीट 5 रुपये एवढे होते. आताच्या काळात विचार केला, तर जवळपास 100 कोटीपेक्षाही जास्त या चित्रपटाचा गल्ला आपण गृहीत धरू शकतो.