पराभवाचे चिंतन करू – चंद्रशेखर बावनकुळे

11

नुकताच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे . या निकालामध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकस आघाडीला तीन जागांवर यश मिळाले आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या संपूर्ण निकलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे यांनी म्हटले कि, आम्ही निवणुकीमध्ये उत्तम प्रकारे लढलो. मात्र भाजप हरली असा रंग दिला जात आहे. अमरावतीमध्ये झालेल्या पराभवच आम्ही चिंतन करू, त्यावर अभ्यास करू. तिथे पराभव व्हायला नको होता. अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो, असे मत बावनकुळे यांनी मांडले.

बावनकुळे यांनी म्हटले कि, सत्यजित तांबे यांनी आता निर्णय घ्यावा, आम्ही त्यांना कुठलीही ऑफर देणार नाहीत. सत्यजित तांबे यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील असे बावनकुळे यांनी म्हटले.

राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. बावनकुळे यांनी म्हटले कि, राऊत यांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. मात्र भाजप ठामपणे नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.