निवडणुकीत गाफील राहता काम नये, त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केली आहे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

3
पुणे  : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सहा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. निवडणुकीत गाफील राहता काम नये. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
  चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आज महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा झाला.   शिवसेना,आरपीआय, शिवसंग्राम संघटना , पतितपावन संघटना या सगळ्याचे शहर आणि कसबा स्तरावरचे प्रमुख नेते उपस्थित होते. सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. आज संध्यकाळापर्यंत केंद्राकडून  कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांची नावे  घोषित करतील, अशी अपेक्षा आहे.

निवडणुकीसाठी अदयाप कोणाचंही नाव नक्की झालेले नाही. आता आम्ही केंद्रातून घोषणा होण्याची वाट पाहत आहोत. हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी या निवडणुकीच्या राजकीय  रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या  सर्व नेत्यांशी संवाद साधत आहेत. भाजपकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप  यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. हि निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तिथल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा आहे कि उमेदवारी हि  त्याच घरात द्यावी अशी इच्छा आहे. त्याच निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
घर फोडण्याची परंपरा हि मोठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना रोज उठून  यांनी गद्दारी केली असे म्हणत आहे. तर मग २०१९ मध्ये त्यांनी  काय केले. त्यामुळे राष्ट्रवादीची माणसं म्हणतात यांनी कि यांनी आमची लोक पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं , असे पाटील यांनी म्हटले. आम्ही सगळे सहनशील आहोत म्हणजे आम्ही भित्रे नाही. घरं कोणी कोणाची फोडली, पाठीत खंजीर कोणी कोणाच्या खुपसला याची एक वेगळी पत्रकार परिषद करण्याची माझी इच्छा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.