मुंबई महानगर पालिकेचा २०२३ -२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच महापालिकेने ५० हजार कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४. ५ टक्के वाढ झाली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकणं टाळलं. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७,२४७. ८० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पात असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी म्हणजेच कोस्टल रोडसाठी ३,५४५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रूपये अर्थसाहाय्य देण्याचे प्रास्ताविले आहे.
पालिकेने नवे प्रकल्प हाती घेण्याऐवजी सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मुंबई महापालिका नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग ऍप्प विकसित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या ठेवी या ८० हजार कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे बजेट ५२ हजार कोटी आणि मुदत ठेवी ८० हजार कोटी असे एकूण १. ३२ हजार कोटींहून अधिक भांडवल असलेली मुंबई महापालिका हि आशियातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हंणून ओळखली जाते.
कोस्टल रोड, शिक्षणं विभाग, गोरेगाव – मुलुंड रास्ता, रस्ते सुधारणं, पर्जन्य जलवाहिन्यांसाठी , वैद्यकीय शिक्षण, आणि आरोग्य, यासोबतच हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी , कीटकनाशके आणि फॉमिंग मशिन्ससाठी, असंसर्गजन्य आजारांसाठी, शिव योग केंद्रासाठी अशा प्रकारे बजेटपैकी ५२ टक्के रक्कम विकासावर खर्ज होणार असल्याची माहिती चहल यांनी दिली.
Get real time updates directly on you device, subscribe now.