15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे शाळा सुरु करा, मुंबई महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश

7

मुंबई: मुंबई महापालिका  क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी, 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण आज महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने मुंबईतील पहिली ते सातवीचे वर्ग 15 डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी 30 नोव्हेंबरलाच निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या सर्व सूचना शिक्षण विभागाने संबंधित शाळांनाही देण्यात आल्या आहेत. मात्र काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या शाळा सुरू करण्यासाठी मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या त्रुटी यावर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, अशी सांशकता ही पालकांमध्ये व्यक्ती केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.