पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. भाजप कडून जगताप यांच्या पत्नी आश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे याची अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करण्यात आला आहे. राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी यासंदर्भात आज राहुल कलाटे यांची भेट घेतली.
सचिन अहिर यांनीं माध्यमांना याबाबत माहिती देताना म्हटले कि, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी भविष्यात महाविकास आघाड़ीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल. उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला , अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली.
सचिन अहिर पुढे म्हणाले कि, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी देखील त्यांचं बोलणं करूंन दिल आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. निवडणुकीतून माघार घयावी अशी विनंती आम्ही केली असल्याचे अहिर यांनी म्हटले.
अहिर यांनी म्हटले कि, कलाटे यांनी याबाबत सांगितले कि मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू. कलाटे हे नक्कीच माघार घेतील आणि महाविकास आघाडीबरोबर राहतील अशी अपेक्षा अहिर यांनी व्यक्त केली.