निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का… शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळालं

21

राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता बदलानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. आज निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का देत असे जाहीर केले कि, शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याने हा एक उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदे हे काही महिन्यांपूर्वी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडले. त्यांनतर त्यांनीं भाजप सोबत युती करत नवे सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. अनेक महिन्यांपासून हि लढाई सुरु होती. आज याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
२०१८ मध्ये शिवसेना पक्षाने घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणूक न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेत पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला असल्याचे म्हटले गेले. अशा पक्षाच्या ढाच्यात विश्वसार्हता नाही असे आयोगाचे म्हणणे आहे. हा पक्ष स्वतः मालमत्ता झाली. असे आयोगाने म्हटले आहे.

 

 

संजय राऊत यांनी या निकालांनंतर ट्विट करत म्हटले कि, निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते.ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच.खोके चमत्कार झाला! लढत राहू.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.