गोगावलेंची ताकद वाढली, मनसेच्या तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

68

महाड: निवडणुकीचे पडघम राज्यात वाजत असताना महाड विधानसभा मतदारसंघात मात्र अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे पक्ष प्रतोद, महाड विधानसभेचे तीन टर्म आमदार भरतशेठ गोगावले आणि काँग्रेसचे दिवंगत माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उबाठा गटाच्या स्नेहल जगताप यांचा सामना येथे होणार आहे.
आमदार गोगावले यांचे पुत्र आणि युवासेनेचे राज्य कोअर कमिटी सदस्य तथा सचिव कोकण विभाग विकास गोगावले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून काल त्यांच्या कार्य प्रणाली वर विश्वास ठेवून गणेश वाडी चांडवे येथील मनसे महाड तालुका अध्यक्ष यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच विकास गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भरतशेठ यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. या प्रवेशामुळे गोगावले यांची ताकद आणखी वाढली असून विरोधकांना जोरदार धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने मनसे तालुका अध्यक्ष महाड राजा जयराम घावरे, विभाग अध्यक्ष अजय राजाराम सकपाळ, उपविभाग अध्यक्ष विकास सुधाकर कदम, शाखा अध्यक्ष अतुल गजानन पाटणे, यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

माजी रा.जि.प. सदस्य मनोज काळीजकर, शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप झांजे, शिवसेना संपर्क प्रमुख लक्ष्मन भोसले, विभाग प्रमुख  विजय धाडवे यांनी प्रवेश कर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.