समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे – चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेना, उद्धव ठाकरे, आणि एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी एकत्र यावे.  हिंदुत्वाच नुकसान हे  सगळे करत आहेत. हे सगळं थांबलं पाहिजे. असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.  समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.  उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही समविचारी नाहीत. अशी  प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता बीजेपी निवडणूक लढणार असा प्रश्न उपस्थित केला असता चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आमचे नेते हे देवेंद्र  फडणवीस आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार. दोन्ही राजकीय पक्ष वेगळे आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे  नेते आहेत. पण ते प्रामुख्याने शिवसेनेचे नेते आहेत. आमचे नेते हे देवेंद्र फडणवीस आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही त्यांना सर्वार्थाने नेते मानतो

शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या सेनेपेक्षा जास्त सन्मान मिळेल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांनी इतिहासात ज्याची नोंद झाली असे  करून दाखवले आहे. सिटी मिनिस्टर असताना बाहेर पडणं हे सोपं नाही. एकनाथ शिंदेनी कशाचाही विचार न करता केवळ विकास असा विचार करून ते बाहेर पडले. आम्ही त्यांना सर्वार्थाने नेते मानतो.

ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या   निवडणूक होतील असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला. पावसाळा झाला कि निवडणूक घेता येईल.

राहुल गांधी यांना फीड करणारी माणसं चुकीची….

राहुल गांधी हे रोज माझी कोणी दखल घेत नाही म्हणून नवीन काहीतरी करत असतात. सावरकरांचं यांनी काय वाचल ? असा प्रश्न आहे. सावरकर यांना कधी भेटले? यांनी भारतीय इतिहासाचा कधी अभ्यास केला ? ज्यावर ते इतक्या अधिकारवाणीने बोलत आहेत. याचा अर्थ त्यांना फीड करणारी माणसं चुकीची असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे हे स्वतः काही विचार करत नाहीत

उद्धव ठाकरे हे स्वतः काही विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणाचं ऐकावं, आणि ते समज हितासाठी केवढ्याला पडेल याचा विचार करावा. महाविकास आघाडीत अजूनही सहा महिन्याने महानगरपालिका , एक वर्षाने लोकसभा निवडणूक असेल तर हे एकत्र राहू शकत नाहीत. एकत्र राहिलेत तर त्यांच्यातले जे इच्छुक आहेत ते आपल्या पक्षाचा आदेश मानणार नाहीत. त्यामुळे मतांचं विभाजन होणार, असे पाटील यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!