निवडणूक आयोगाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात घडामोडीना वेग आला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. परंतु सुप्रीम कोर्टाने आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. कोर्टाने असे स्पष्ट केले आहे कि, उद्या मेंशनिंग लिस्ट अंतर्गत या असे सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले होते कि, निवडणूक आयोगाच्या निर्यणाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज त्यांनी याचिका दाखल करण्याचा प्रयन्त केला. परंतु न्यायालयाने आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. ठाकरे गटासाठी आज आणखी एक धक्का मानावा लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!