“या” चा मोठा फटका आमच्या उमेदवारांना बसला, जितेंद्र आव्हाडांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

52

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून सत्ताही स्थापन झाली नाही या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून विरोधकांना ठरविण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे आव्हाड यांनी म्हंटले आहे. याबाबत आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने विरोधकांना हरविण्याचे केलेले हरेक प्रयत्न अवघ्या देशाने पाहीले आहेत.उमेदवारांना देण्यात आलेल्या चिन्हांचा बाजार हा देखील त्यातीलच एक प्रकार. आमच्या पक्षाने १० जागी उमेदवार उभे केले होते.तुतारी वाजवणारा माणूस हे आमचे चिन्ह होते. त्यातील ९ जागी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना ट्रंपेट हे चिन्ह दिलं.या ट्रंपेट च मराठी भाषांतर तुतारी अस करण्यात आले.याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिलं नाही.परिणामी याचा मोठा फटका आमच्या उमेदवारांना बसला असे आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

 

यासोबतच साताऱ्याचे उमेदवार श्री.शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचे हेच कारण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे, साताऱ्यात तुतारी सदृश चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला ३७,०६२ मते मिळाली, तर शिंदे यांचा पराभव ३२,७७१ मतांनी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील इतर आठ मतदारसंघातही या तुतारी सदृश चिन्हाचा मोठा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला बसल्याचेही त्यांनी सांगत आकडेवारी दिली आहे.

इतर ८ ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या मतधिक्यावर या गोष्टीचा मोठा परिणाम झाला असल्याचे आव्हाड सांगतात.

माढा – ५८,४२१
बीड – ५५,८५०
शिरूर – २८,३३०
बारामती – १४,९१८
रावेर – ४३,९८२
नगर – ४४,९५७
भिवंडी – २४,६२५
दिंडोरी – १,०३,६३२.
अशी एकूण ४ लाख १४ हजार मते तुतारी सदृश चीन्हाला मिळाली.येणाऱ्या विधानसभेत असा घोळ होऊ नये यासाठी पक्षीय पातळीवर योग्य ती पावले उचलण्यात येतीलच.परंतु निवडणूक आयोग किती पक्षपाती काम करत होत,हे या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या लक्षात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी अधोरेखित केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.