ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याविषयी महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव यावर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.