पालकमंत्री चंद्रकांत पाटील अतिशय आक्रमकपणे कसब्यात प्रचारात, प्रचार फेरी, जाहीर सभांद्वारे साधत आहेत व्यक्तिगतरीत्या मतदारांशी संवाद

5

पुणे – पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांत येत्या २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत भाजपपुढे महाविकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

दरम्यान, कसबा मतदार संघात महाविकास आघाडीने आणि भाजपने प्रचारासाठी नेत्यांची फौजच उतरवली आहे. भाजपचे देखील अनेक दिग्गज नेते प्रचार करत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः अतिशय आक्रमकपणे कसब्यात प्रचार करताना दिसून येत आहेत. विविध जातीधर्मातील लोकांशी ते संवाद साधत आहेत, सोबतच विविध संघटना, मंडळ, यांच्याशी ते सातत्याने संवाद साधत आहेत.

 

याशिवाय विविध कार्यक्रमांनाही ते हजेरी लावत आहेत. प्रचार फेरी, जाहीर सभा, व्यक्तिगतरीत्या मतदारांशी संवाद साधत भाजपालाच मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत. नुकताच त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या महिलांशीही संवाद साधला. दरम्यान, मतदारांशी संवाद साधताना चंद्रकात पाटील हे सरकारच्या विविध योजनांची देखील ते आवर्जून माहिती देत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना देखील ते या निवडणुकीत झोकून देवून काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.