पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे… शरद पवार यांनी प्रथमच या प्रकरणावर केले भाष्य

5

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांनी आज पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले. त्यांनी म्हटले कि, पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली. महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. शरद पवार यांनी प्रथमच या प्रकरणावर भाष्य केले.

पहाटेच्या शपथविधीवरून पान्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. या शपथ विधीबाबत शरद पवार यांनी म्हटले या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते कि, पहाटेच्या शपथ विधीबाबत सगळ्याची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही  शपथ घेणार हे माहित होत. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका  दिला, असं फडणवीस यांनी म्हटले. जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो. यावर शारद पवार यांनी म्हटलं कि, देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत आहेत.

२३ नोव्हेंबर २०१९ ला हा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यादोघांचा शपथ विधी पार पडला. एका रात्रीत हि घडामोड घडली होती. परंतु दोन दिवसात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना परत बोलवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.