विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपालाच विजयी करा, चंद्रकांत पाटील यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

21

पुणे : हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ बुधवारी भाजपा जैन प्रकोष्ठ आणि व्यापारी आघाडीने मेळावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्यातील युती सरकारनं जाचक करप्रणाली रद्द करून व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपालाच विजयी करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्यातील युती सरकारनं LBT सारखी जाचक करप्रणाली रद्द करून व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या. या पुढेही व्यापार करणं सुलभ व्हावं या साठी मदत करत राहूच. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपालाच विजयी करा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील पुढे म्हणाले कि, आपल्याला एलबीटी आठवत असेल तर काँग्रेस सरकारने एलबीटी नावाचा कर आकारला. तो कर जाचक होता. मी स्वतः व्यापारी आहे. माझी स्वतःची कंपनी आहे. त्यामुळे मला माहिती आहे कि त्या एलबीटी मुळे आम्ही किती हैराण होतो. २०१४ ला आमचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला कि एलबीटी रद्द करायचा. २८०० कोटी रुपये देवेंद्रजींनी माफ करुन टाकले.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितले कि, नंतर व्हॅट आलं, आता जीएसटी आलं. व्हॅट च्या माध्यमातून आपण व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करत आलो. व्यापाऱ्यांना व्यापार करायला कसं सोपं जाईल हा विचार आपण नेहमी करत राहिलो. भारतीय जनता पार्टी तुमचे प्रश्न नेहमीच सोडवत राहिली. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने अनेक लोक मला भेटत असतात. व्यापाराशी संबंधित असो किंवा जागेसंबंधी असो.तुमचे सगळे प्रश्न मी सोडवेन असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.