आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप कारण सुरु झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावरून खासदार संजय राऊत याची जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेची चर्चा चालू होती . मी तेव्हा उपस्थित होतो. तेव्हा मी काय म्हणालो हे मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. यावर राऊत यांनी म्हटले कि, मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकारचं धोरण हे होत कि कुणावरही राजकीय सुडापोटी कारवाया करायच्या नाहीत. ते धोरण आम्ही पाळलं. नाहीतर अत्यंत संथ गतीने अनेक तपास झाले नसते. तावून – सुलाखून काढलं नसत, असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी राऊत यांनी यावेळी विक्रांत घोटाळ्यावर वक्तव्य केले. ते म्हणाले कि, विक्रांत घोटाळा हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा झाला. ठाकरे सरकारने यावर काळजीपूर्वक तपास करायला सांगितले. अटक करता आली असती. नव्या सरकारने सत्तेवर येताच अनेक प्रकरण दडपून टाकली. क्लीनचिट दिली. फडणवीस , महाजनांना अटक कारण्यासंदर्भात असं कधी झालं होत. याचा अर्थ सध्याचे मुख्यमंत्री त्या गुन्ह्यात सहभागी होते. मग ते तेव्हा तोंड आवळून का बसले होते? असा सवाल राऊत याची उपस्थित केला.