पुण्यातील भिडे वाड्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती, या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे

2
पुण्यातील भिडे वाड्याच्या प्रश्नावर येत्या १० तारखेला या प्रश्नावर पुन्हा सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूंना रेडीरेकरने तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महाननगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री म्हणाले कि, येत्या १० तारखेला या प्रश्नावर सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूंना रेडीरेकरने मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे देखील शिंदे यांनी म्हटले.
भुजबळ नेमकं काय म्हणाले ?
क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून भारतातील महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्या ऐतिहासिक शाळेचे भिडे वाड्यात पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. सरकार बदलल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यात कालबद्ध कार्यक्रम ठरवून दोन महिन्यात या ठिकाणी भूमिपूजन करू, असे ठरविण्यात आले. मात्र तसे घडले नाही. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी मी स्वतः उपस्थित राहून वकिलांशी चर्चा केली. गाळाधारकांना योग्य मोबदला दिल्यास ते ही केस मागे घेण्यास तयार आहेत. मात्र शासनाकडून विलंब होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ठोस पावले उचलण्याची मागणी राष्ट्रवाादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.