२०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केले तर विधानसभा २०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील – संजय राऊत

18

खासदार संजय राऊत यांनी कसब्यातील निकालावरून भाजपाला पुन्हा टार्गेट केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जर इकडे तिकडे झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केले तर विधानसभा २०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. यासोबतच लोकसभेला ४० जागा निवडून येतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला .

संजय राऊत यांनी चिंचवड निवडुकीबाबत म्हटले कि, चिंचवडमध्ये आमच्याकडून चूक झाली. चिंचवडमध्ये विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवड मध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो, हा विजय त्याच पॅटर्नचा असल्याचे राऊत यांनी म्हटले. उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटे यांनी माघार घेतली असती  तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत यांनी म्हटले.
राऊत यांनी यावेळी सांगितले कि, निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचं दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली तरीही   कसबा आणि पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जी चपराक दिली, त्यातून धडा घ्यावा असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. भाजपने घराघरात पैसे देण्याचे काम केले पण जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा तो झाँकी है , महाराष्ट्र अभि बाकी है , असे विधान राऊत यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.