बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण

2

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही काही प्रश्नांमध्ये चुका होत्या, ते प्रश्न ज्या विद्यार्थ्यानी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल अशा विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचे समोर येताच बोर्डाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

२१ फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी बोर्डाने आपल्या चुका मान्य  केल्या आहेत. बोर्डाकडून  या चुका मान्य करत विद्यार्थ्याना  सहा गुण देण्याचा निर्णय जाहीर केला.
बोर्डाकडून असे जाहीर करण्यात आले कि, बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. बोर्डाकडून याबाबत अहवाल जारी करत पेपरमधील चुका बोर्डाने मान्य केले. बोर्डाने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. या परिपत्रकात म्हटले आहे कि, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी पेपरमधील चुकीचे तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत. या एक विद्यार्थ्याना दिलासा म्हणावा लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.