पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस आणि हेमंत रासने यांची भेट
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात कसब्यातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. तसेच खासदार गिरीश बापट यांची देखील भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या निवडणुकीत कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला पण खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला लागण्याचे चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना यावेळी आवाहन केले.
चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी खासदार गिरीशजी बापट यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. गिरीश बापट यांनी आपली प्रकृती नाजूक असताना देखील निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला होता.