राज्यात विशेष महिला धोरण राबविण्यावर आमचं सरकार भर देईल – चंद्रकांत पाटील 

8

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस असून सर्व मंत्री आणि आमदार या अधिवेशनासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील आज विधान भवन येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत दाखल झाले.

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाटील यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आणि राज्यात विशेष महिला धोरण राबविण्यावर आमचं सरकार भर देईल असे सांगितले. तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय धोरण आज सादर करण्यात येणार असून त्यामध्ये राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा जनतेसमोर येणार आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबत पाटीलयांनी यंदाच्या अर्थसंकल्पासाठीही सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचे म्हंटले.

पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी यासाठी उपमुखमंत्र्यांना निवेदन 

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी आज पुण्याचे माजी महापौर आणि भाजप सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी समवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आलया आहेत. या दोन्ही मागण्यांसंदर्भात सकारात्मक दर्शवत पुढील आठवड्यात या संदर्भात बैठक घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.