केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता पार्टी च्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात भाजपाचे महामंत्री व भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे पालक संजय केनेकर, भाजप कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे, भाजप चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय सरोज,जनसंपर्क प्रमुख कौस्तुभ दबडगे यांच्या उपस्थितीत केतन महामुनी यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. भाजप सरचिटणीस संजय केनेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजप चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष अमित अभ्यंकर, पुणे जिल्हा अध्यक्ष शामराव कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय चित्रपट कामगार आघाडीचे पालक संजयजी केनेकर साहेब यांनी दिलेली ही जबाबदारी मोठी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ ते निर्माते यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आणि आघाडी बळकट करण्याचे काम संजयजी केनेकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली अत्यंत जोमाने केले जाईल अशी ग्वाही नवनिर्वाचित प्रदेश चिटणीस केतन महामुनी यांनी यावेळी दिली.