छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, भाजपा चित्रपट कामगार आघाडी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला शिवचरित्र भेट पाठविणार

नंतर माफी मागण्यापेक्षा, बोलताना विचार करून बोला

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी उल्लेखामुळे मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. उदगीर येथील एका मॉलच्या उदघाटन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने नेटकऱ्यांनी प्रार्थनाला चांगलेच धारेवर धरले आहे.

भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष केतन महामुनी यांनी देखील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिला सद्बुद्धी लाभो म्हणत, भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने प्रार्थनाला शिवचरित्र पाठविणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट केतन महामुनी यांनी केली आहे.

प्रार्थनाजी नंतर माफी मागण्यापेक्षा, बोलताना विचार करून बोला. माफीनाम्यात चूक झाली असेल तर माफ करा.. हे म्हणणे म्हणजे अजूनही चूक समजली नाही आहे हे लक्षात येतं. प्रार्थना करा की पहिली अनावधानाने झालेली चूक आहे असं समजून शिवप्रेमी, मराठी रसिक माफ करेल. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख न करण्याची आपल्याला सद्बुद्धी लाभो हीच शिवप्रेमींची प्रार्थना आहे. भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने शिवचरित्र आपल्याला पाठवीत आहोत. लवकरच मिळेल..नक्की वाचा..!! वाचल्यावर चूक होणार नाही खात्री आहे. जय शिवराय..!! असे आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणत भाजपा चित्रपट आघाडीचे केतन महामुनी यांनी बेहेरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!