विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेचा अजित पवारांकडून तीव्र शब्दात निषेध

30

सत्ताधाऱ्यांकडून देशातील लोकशाहीची हत्या केली जात आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांसह तोंडाला काळ्या रिबीन बांधून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध आज करण्यात आला. सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरातून संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

अजित पवार म्हणाले कि, राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि वेगळ्या प्रकारचा अंकुश सदस्यांवर होईल अशी अपेक्षा होती. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला मात्र विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की, दिवसाच्या शेवटी याप्रकरणी निकाल द्यायचा, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत मात्र अध्यक्ष निर्णय जाहीर करत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या महाराष्ट्राला संस्कृती, परंपरा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी या राज्याचे नेतृत्व केले आहे. अशा दिग्गज नेत्यांचे पुतळे या परिसरात आहेत. त्याच परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याची घटना घडली. त्याचा तीव्र शब्दात अजित पवारांनी निषेध केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.