जेव्हा लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येतं, त्यावेळी स्वाभाविकपणे प्रभागातील अनेक प्रश्न सुटतात – चंद्रकांत पाटील

पुणे : निवडणुका पुढे ढकलण्याचं कारण जाणीवपूर्वक सरकारवर ढकललं जातं असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ज्यावेळी लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येतं, त्यावेळी स्वाभाविकपणे प्रभागातील अनेक प्रश्न सुटतात, असेही त्यांनी सांगितले. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना याबाबत आपले मत त्यांनी व्यक्त केले.
सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरु आहेत त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  एक ओबीसी आरक्षणाची आहे आणि एक प्रभाग पद्धतीची केस सुरु आहे. आता सुप्रीम कोर्टालाही भारतीय जनता पार्टी मॅनेज करते, असं त्यांचं म्हणणं असेल तर ठीक आहे, कारण तो त्यांचा नेहमीचाच सवयीचा भाग आहे. ज्यावेळी कसब्यात जिंकतात त्यावेळी ईव्हीएम मशीन ओके असतं आणि चिंचवड मध्ये हरलो तर ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम असतो, असा टोला चंद्राकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला.
कोर्टामध्ये केस सुरु असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  त्याच खापर सरकारवर  फोडण्याचं कारण नाही. ज्यावेळी लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येईल त्यावेळी स्वभाविकपणे माझ्या भागात काय? , माझ्या गल्लीत काय असे विषय सुरु होतील, असे पाटील म्हणाले.
आता जे मोठे प्रोजेक्ट जयकापासून , मेट्रोपासून रस्त्यांच्या दुरुस्तीपासून सुरु आहेत. त्याला सरकारने पुरेसा निधी दिलेला आहे. कुठल्याही मोठ्या विषयाचे तीन वर्षाचे तीन पार्ट असतात. त्यातला जरी त्यांनी ९ हजार कोटींचे बजेट दाखवलं असलं तरी काही विषयांवर  या वर्षीचा  त्यातील काही पार्टच  अपेक्षित आहे , असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.