इतिहास शिक्षणाच्या नवीन निर्णयाबाबत योगीजींच्या सरकारचे अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : शाळेतील इतिहास शिक्षणाच्या बाबतीत आपल्या महापुरुषांचा इतिहास कमी तर मुघलांचा इतिहास मोठ्या प्रमाणात होता. त्यात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकारने घेतला यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयासाठी उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन केले.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी योगी सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले कि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकताना एक पान आणि मुघलांचा इतिहास शिकताना १० पानं याची काय आवश्यकता नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे १०० पानी पुस्तक अभ्यासक्रमामध्ये पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र हे ५० पानी पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अशा ज्या महापुरुषांचं चरित्र वाचून आम्हाला स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल ते आमच्या अभ्यासक्रमात आणा , असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचे पाटील यांनी स्वागत केले.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSC बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी सरकारने बदलला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेला मतभेद , औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात झाले आहेत. २०२३ – २४ या वर्षापासूनच हा बदल करण्यात आला आहे.