पुण्यात होणारी रोलबॉलची आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई  : येत्या २१ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे रोलबॉलची अंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या स्पर्धेची जोरदार तयारी सुरु असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

बुधवारी मुंबईत या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,क्रीडा मंत्री गिरीषजी महाजन, रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष ऍड.अमोल काजळे पाटील, मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग आणि चंदन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, रोलबॉलची अंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जन्म पुण्यात झाला असल्यामुळे व आता तब्ब्ल ५७ देशात हा वेगवान खेळ खेळला जात असल्याने त्याची पुण्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. स्पर्धेसाठी क्रीडानगरी मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!