वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ई-टेक्सटाईल’ प्रणालीची सुरुवात

14

मुंबई : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘ई-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या ‘ई-टेक्सटाईल’ प्रणालीची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याचे नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन या माध्यमातून अधिक रोजगार निर्मिती करावी अशा सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या.

वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनांकरिता एण्ड टू एण्ड प्रोसेस ॲटोमेशन करण्यासाठी ही प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे. सहज व सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातील सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘ई-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागाचे सचिव सिंह यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.