शनिवार वाड्याच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर काहीना काही मार्ग निघेल याची खात्री – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे  : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. प्रथम शनिवार वाड्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याबाबत पाटील म्हणाले कि, पुरातत्व खात्याने परिपत्रक काढलं, कि शनिवार वाड्याच्या १०० मीटर परिसरात कुठलाही बांधकाम काढायचे नाही. हा केवळ शनिवार वाड्याचा विषय नाही. देशभरामध्ये ३५० ठिकाणी हा प्रश्न आहे. यामध्ये एक विषय आहे महाराष्ट्र शासनाशी निगडित आहे कि बांधकाम काढताना ९ मीटर अंतर रस्ता सोडणं गरजेचे आहे. या विषयामध्ये राज्य शासन सकारात्मक असल्याचे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, पुरातत्व खात्याच्या नियमानुसार आता  हि केस कोर्टात सुरु आहे. हि केस कोर्टात असल्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने जर स्टे दिला नसेल तर असं परिपत्रक काढून लोकांना बांधकामापासून दूर का ठेवता? यासंदर्भात एक बैठक लवकरच घेतली जाईल असे पाटील म्हणाले. यातून काहीना काही मार्ग निघेल याची खात्री असल्याचे देखील पाटील म्हणाले.
यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, तीन  वर्षाची डिग्री ऐवजी चार वर्षाची डिग्री असणार आहे ज्यामधून करिअरला लागणाऱ्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त  व्यक्तिमत्व विकासाचा  विषय असेल , बाकीचे विषय देखील असतील. तसेच या  चार वर्षाच्या डिग्रीची सक्ती नसेल. दोन वर्षाच क्रेडिट घेऊन विद्यार्थी विदेशात कुठेही जाऊ शकतात.  व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे असे पाटील म्हणाले.
अवेळी  येणाऱ्या पावसाच्या  नुकसान भरपाई बाबत पाटील म्हणाले कि,  कायमस्वरूपी कायदा आपल्याकडे केला गेला. मदत पुनर्वसन चे काही नियम आहेत. किती नुकसान भरपाई आल्यावर मदत करायची, कधी नुकसान झालं तर भरपाई द्यायची. त्यामध्ये अवेळी पाऊस याचा समावेश नव्हता. परंतु आता याचा आपण समावेश केला आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले.