ओबीसींसाठीच्या सुविधा वाढवण्याचा प्रयन्त आगामी काळात करणार – चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळीच फुले वाड्यात भेट देऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मुतीपुढे ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले कि, आज जी स्थिती बहुजन समाजाची आहे ते विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या असू देत यात कोणाची जात यावर प्राधान्य न राहता गुणवत्तेच्या जोरावर जे प्राधान्य मिळाल. जी गुणवत्ता बहुजन समाजाच्या तरुण तरुणींनी धारण केली याचं श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जात. आज महिलांनी तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण या सगळ्या क्षेत्रात त्यांची जी प्रगती झाली त्याच सगळं श्रेय सावित्रीबाई फुले यांना दिले पाहिजे.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि आम्ही हा संकल्प करायला आम्ही आलो आहोत कि, अजूनही त्यांचं कार्य अपुरं राहील आहे. महाराष्ट्र शासन ते पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयन्त करत आहे. नवीन सरकार आल्यावर ओबीसींच नवीन मंत्रालय झालं आहे. महाज्योती या नावाने महामंडळाची स्थापना झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृहाची घोषणा झाली, बऱ्याच ठिकाणी कामाला सुरुवात झाली. अशा अनेक गोष्टी सुरु झाल्या. या सुविधा वाढवण्याचा प्रयन्त आगामी काळात करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणे , ज्यामध्ये इंन्दु मिलचे बाबासाहेबांचे स्मारक असेल. बाबासाहेबाचं जन्मगांव असेल, दिल्ली असेल, लंडन येथील त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल हि सगळी ठिकाण हळूहळू मोदीजींनी स्मारक म्हणून घोषित केली, असे पाटील यांनी सांगितले.