वेगवेगळ्या परिसरात, वस्ती पातळीवर धम्माचे कार्यक्रम व निराधार मुलांना शैक्षणिक उपक्रम आयोजित करावे यासाठीची सर्व प्रकारची मदत करणार – चंद्रकांत पाटील

पुणे : आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव,विश्वरत्न,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुणे येथील निवास्थानी बौद्ध भन्ते डॉ. राहुल बोधी, भन्ते धम्मसेन बोधी,भन्ते विमल बोधी,भन्ते अनोमादस्सी बोधी यांनी त्रिसरण पंचशील देऊन आपल्या हस्ते पुण्यपारमिता लाभ होत राहो, या करीता मंगल मैत्री दिली. यासाठी चिवरदान व धम्मदान करून एक आगळ्या, वेगळ्या पद्धतीने जयंतीच्या पूर्व संध्येला जयंती निमित्त चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरात व वस्ती पातळीवर धम्माचे कार्यक्रम व निराधार मुलांना शैक्षणिक उपक्रम आयोजित करावे यासाठीची सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या नियोजनाखाली करण्यात आले आहे.

आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष आसिफ गांगुर्डे, निलेश अल्हाट, भाजपचे प्रदेश सचिव अतुल नाना साळवे, विकास सोनवणे, संदीप शेळके, संदीप ओव्हाळ, वीरसेन जगताप, धर्मेंद्र खांडरे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!