मोफत कृत्रिम अवयव प्रदान सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत उपस्थितांना प्रोत्साहित केले. कोल्हापूर येथे कृत्रिम अवयव प्रदान सोहळ्यास उपस्थित राहिले. यासोबतच त्यांनी सपत्नीक खेळघर उपक्रमात सहभाग घेतला. 

कोल्हापूर येथील मेरीड इंडिया संचालित सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषदेच्या माध्यमातून मोफत कृत्रिम अवयव प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून गरजू दिव्यांगाना कृत्रिम अवयव प्रदान करुन, एक आधार दिला. सावली केअर सेंटर अनाथ, वयोवृध्द, दिव्यांग यांच्या सुश्रूषेचं ठिकाण असून, त्यांना हे सेंटर एक आधारवड वाटते, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

या कर्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज सपत्नीक खेळघर उपक्रमात सहभाग घेतला. आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या दोन प्रमुख उद्देशातून खेळघर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मुलांचा दरवर्षी सामुहिक वाढदिवस साजरा केला जातो. यंदाही हा वाढदिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन त्यांचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले