पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला कोथरुडमधील सोसायट्यांच्या समस्यांचा आढावा

3

पुणे : कोथरुड येथील सिग्मा वन, शिल्पा व अभिशिल्प को.हौ.सो. तसेच कर्वेनगर येथील यशश्री कॉलनी रहिवासी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सोसायटीतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न, पार्किंग आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सिग्मा वन सोसायटीला पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने पाण्याची अतिरिक्त गरज भागवण्यासाठी पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात, यापुढे सोसायटीला महानगरपालिकेकडून दररोज किमान एक टँकर पाणी देण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देखील पाटील यांनी दिले.

एमआयटीने आपले पार्किंगचे काम जलदगतीने पूर्ण करावे आणि संस्थेचे विकेंद्रीकरण करावे जेणेकरुन एकाच ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढणार नाही, असे निर्देश दिले. महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, सिगारेट आदी पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने दैनंदिन गस्त घालावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माईर्स एमआयटी संस्था समूहाच्या सह महासचिव डॉ. अदिती कराड, सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.