धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती दिनी महिलांची शौर्यपीठ तुळापूरला भेट, स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ यांचा स्तुत्य उपक्रम

पुणे : काल छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील भाजपा शहर भाजपा सदस्या तसेच स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ यांनी या दिवशी कोथरूड राजमाता जिजाऊनगर येथील महिलांसाठी खास आयोजित केलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान ज्या पुण्यभूमीमध्ये झाले ते शौर्यपीठ,धर्मपीठ तुळापूर सहलीला परिसरातील महिला, वृद्धांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक समीर पाटील आणि त्यांच्या स्मिता पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून सहलीला सुरुवात करण्यात आली.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून छोट्या मुलांनी महिलांनी आणि वारकरी संप्रदायातील वृद्धांनी उस्फूर्तपणे सहलीचा आनंद घेतला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि आनंदात सगळीकडे साजरी केली जाते. त्याच उत्साहात आणि आनंदात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली गेली पाहिजे यासाठी स्वारद फाउंडेशनच्या वतीने पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील चौका चौकातील गणेश मंडळांना पत्रे पाठवून आवाहन केले गेले होते व त्यास गणेश मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि नेहमीपेक्षा जास्त ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती साजरी झाली असल्याची माहिती यावेळी स्वाती शरद मोहोळ यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!