सकाळ नाट्य महोत्सवास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांनी उपस्थित राहून कलाकारांना दिल्या भरभरून शुभेच्छा
पुणे: गुरुवार दिनांक १८ पासून सुरु झालेला, सकाळ नाट्य महोत्सव रसिकांसाठी खूप लोकप्रिय ठरला आहे. बालगंधर्व नाट्यमंदिर येथे आयोजित सकाळ महोत्सवास उपस्थित राहून कलाकारांसह नाट्यमहोत्सवास पुण्याचे पालमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. हा नाट्यमहोत्सव 18 ते 22 मे च्या दरम्यान झाला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर रसिकवर्ग उपस्थित होता.
या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक ‘वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रा.लि’ हे आहेत. तर महोत्सवाचे प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.’ हे आहेत. या महोत्सवात,’सारखं काहीतरी होतंय’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘संगीत देवबाभळी’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू तू मी मी’ हि पाच नाटके सादर होणार आहेत. या महोत्सवात अभिनेत्री अमृता देशमुख, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तसेच इतर सहकारी कलाकार उपस्थित होते.
विशेष म्हणजे या महोत्सवात रंगभूमीवरील अतुलनीय कामगिरीसाठी जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना सकाळ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महोत्सवात सामील झालेल्या रसिकांना या क्षणात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.