छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पुणे : आज कोथरूड येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दहावी आणि बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी खास करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात होते.

 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्वाचे असते. या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त आहे, अशी भावना व्यक्त केली.

 

याशिबिरामध्ये दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी, विद्यार्थ्यांसोबत पालकांचे समोपदेशन, विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन याशिबिरामध्ये मिळणार आहे.