पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना चंद्रकांत पाटील

पुणे : आषाढी वारी पालखी सोहळा जवळ येत असल्याने राज्यशासनाकडून देखील पूर्व तयारीच्या कामाला वेग आला आहे. त्याच अनुशंघाने आषाढी वारी पालखी सोहळा – 2023 पूर्वतयारी आढावा बैठक पुण्यात पुण्याचे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यासोबतच यंदा अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश हि पाटील यांच्या कडून अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.