होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील चंद्रकांत पाटलांची ग्वाही
पणे : पुणे महापालिकेने कै. बाबुराव सणस मैदानावर तयार करण्यात आलेल्या 400 मीटर 8 लेन सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील धावपट्टूसाठी हि आनंदाची बाब असून सर्व खेळाडूंकडून पाटील यांचे आभार मानण्यात आले.
होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांसमोर दिली. यावेळी आयोजित स्पर्धेतील विजेत्या धावपटुंचा यावेळी पाटील तयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त राजीव नंदकर, हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, अभय छाजेड आदी उपस्थित होते.