कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारकाच्या कामाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या लौकिकामध्ये आता आणखी भर पडणारं आहे. मराठी साहित्यामध्ये महत्वपूर्ण योगदान असणारे कवी लेखक पद्मश्री ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे महानगरपालिकेच्या मार्फत साकारण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी “गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार स्मारकामध्ये योजना आखाव्यात तसेच महापालिकेने गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश हि चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या कार्यक्रमाला खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.