पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत वेल्हे पोलीस स्थानकाच्या दुमजली नूतन इमारतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत वेल्हे पोलीस स्थानकाच्या दुमजली नूतन इमारतीचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्याचे आश्वस्त केले.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक बप्पा बहीर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित आदी उपस्थित होते.