पुष्पगुच्छ नको, आरोग्य सेवेसाठी मदत करा वाढदिवशी चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांना आवाहन

पुणे : अनेकदा नेते आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतात, भव्य कार्यक्रम, जेवणावळी तसेच पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्त्यांकडून होणारी फ्लेक्सबाजी पाहण्यासारखी असते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र याला अपवाद ठरले आहेत. पाटील यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना “पुष्पगुच्छ नको, आरोग्य सेवेसाठी मदत करा” असे आवाहन केले आहे. याबाबत पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल माध्यमांवर एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.

 

” नेहमीच माझा वाढदिवस मी एका सामाजिक उपक्रमाला समर्पित करत असतो, साधे पणाने करत असतो. परंतु यावेळच्या माझ्या वाढदिवसाला स्वर्गीय गिरीशजी बापट, मुक्ताताई टिळक, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जाण्याची पार्श्वभूमी आहे. म्हणून आरोग्य या सामाजिक उपक्रमाला हा वाढदिवस समर्पित केला असून, त्या विषयाशी संबंधित कार्यक्रम आणि रुग्णांच्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर बिलांसाठी पैसे जमा करणे या उपक्रमा व्यतिरिक्त या वाढदिवसाला कोणीही केक, पुष्प गुच्छ हार आणू नयेत, फटाके वाजवू नयेत तसेच कोणी अनधिकृत फेल्क्स लावू नये अशी विनंती करतो असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

हॉस्पिटलची बिले भरूनही अनेक गरीब रुग्णांना पैसे आवश्यक असतात हार, पुष्प गुच्छ यापेक्षा या आरोग्य सेवेस मदत करावी जेणेकरून हि मदत गरीब रुग्णांपार्यंत आगामी काळात विविध ट्रस्टच्या माध्यमातून पोहोचविण्यात येईल असे हि पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रुग्णांना दिलासा दिल से आवाहनाला कार्यकर्ते पदाधिकारी उत्तम प्रतिसाद देत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

काल वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला चंद्रकांत पाटील यांनी श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यंदाचा वाढदिवस हा आरोग्य सेवेसाठी समर्पित केला असून, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी बळ मिळो, ही विठूराया आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!