माऊलींची सेवा केल्याचे समाधान, स्वारद फाउंडेशनच्या उपक्रमाचा ३५०० वारकऱ्यांनी घेतला लाभ
पुणे : नुकतेच पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. पुण्यात मुक्कामाच्या दरम्यान अनेक सेवाभावी संथानकडून वारकऱ्यांसाठी विविध सेवा पुरविलया जातात. पुण्यातील स्वारद फाउंडेशन ट्रस्ट ने पुण्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी मोफत दाढी व कटिंग सेवा देण्यात आली होती.
स्वारद फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी आषाढी निमित्त वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, यंदाच्या या उपक्रमाचा ३५०० वारकऱ्यांनी लाभ घेतला असून वारकऱ्यांच्या सेवेतून माऊलींची सेवा केल्याचे समाधान मिळते अशा भावना यावेळी स्वारद फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा स्वाती शरद मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
याउपक्रमास स्वारद फाउंडेशनचे शरद मालपोटे, रामदास शिळीमकर , विट्ठल धुमाळ ,सागर फाटक, मंगेश नवघणे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.