उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चिंचवड मधील चाफेकर वाड्याला सदिच्छा भेट देऊन चाफेकरांच्या स्मृतींना केले अभिवादन

7
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील विविध उपक्रमात सहभाग घेतला. यासोबतच आज चिंचवड मधील चाफेकर वाड्याला सदिच्छा भेट देऊन चाफेकरांच्या स्मृतींना अभिवादन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास चाफेकर बंधूंच्या उल्लेखा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. उच्च मूल्य असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या चाफेकर बंधूंनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वतःला स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. पुण्यात प्लेगची साथ पसरली, तेव्हा ब्रिटिशांनी नेमलेला अधिकारी रॅंडचे वर्तन अतिशय वादग्रस्त झाले होते. प्लेग नियंत्रणाच्या नावावर माताभगिनींची विटंबना करणाऱ्या त्याच्या धोरणामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची भावना होती. त्यांच्या या संतापाला वाट मोकळी करुन दिली; ती चाफेकर बंधूंनीच! त्यामुळे आज चिंचवड मधील चाफेकर वाड्याला पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन चाफेकरांच्या स्मृतींना अभिवादन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.