पुणे : जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे संगमवाडी येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकारच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांची अलोट गर्दी होती. भक्तिमय वातावरणात बागेश्वर बाबांचा तीन दिवसीय सत्संग सोमवारी प्रारंभ झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कथामृत श्रावण केले. भक्तजनांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने प्रारंभ करून पहिल्या दिवसाची कथा संपन्न झाली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी सादर केलेले कथामृत श्रवण केले. अध्यात्मिक वातावरण.. अद्भुत अनुभूती!, असे उद्गार पाटील यांनी यावेळी काढले. या अध्यात्मिक कार्यक्रमास पुण्यातील भक्तगणांनी दाखवलेला उदंड प्रतिसाद थक्क करणारा होता, असेही पाटील यांनी म्हटले.
बाबांनी या कार्यक्रमात राम भक्तांची मने जिंकली. त्यांच्या भजनाला टाळ्यांची साथ देत श्रोते प्रवचनात तल्लीन झाले होते. बाबांनी पुण्याच्या ऐतिहासिक , सांस्कृतिक परंपरेचे देखील यावेळी स्मरण केले.