‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

3
पंढरपूर : पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो‌. यावेळी चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीसांसह हरिनामात दंग झाले.
वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.