कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील – चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघाला भेट दिली. पाटील नेहमीच कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नशील असतात. ते नेहमीच विविध उपक्रमांमार्फत नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करतात. नुकताच त्यांनी कोथरूडमधील कर्करोगावर उपचारासाठी दोन नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून दिली.