स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम…. कोथरुड येथे शिवस्मारकास 350 पणत्यांची आरास करून अनोख्यापध्दतीने दीपोस्तव साजरा
पुणे : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान यांनी कोथरुड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या परिसरातील साफसफाई करून तेथे 13 नोव्हेंबर रोजी सायं. ०७. ०० वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुलांची सजावट करण्यात आली होती. ,यासोबतच रांगोळी काढून पणत्यांची आरास देखील केली होती. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी या दिवाळीतील पहिला दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात करण्याचा स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपोस्तवाचा संकल्प करून तो पूर्णत्वास आणला व या दिवाळीची सुरुवात केली.
या उत्सवाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पूजा करून व श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर शंखनाद करून जिजाऊ गर्जना , शिवगर्जना व शंभू गर्जना करण्यात आली.यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्य भिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण झाल्या निम्मित 350 पणत्यांची आरास करून अनोखा दीपोत्सव साजरा करून फटाक्याची आतिषबाजी केली.
या दीपोत्सवाच्या वेळी प्रतिष्ठान चे ऋषिकेश साळुंखे यांनी स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे कार्य व संस्था स्थापनेमागचा उद्दिष्ट स्पष्ट केले .आपल्या भावी पिढीला इतिहास व गड किल्ले हे शाश्वत स्वरूपात बघता यावेत व छत्रपती श्री शिवाजी महाराज व शंभू महाराज यांचे संस्कार आपल्या भावी पिढीत कसे रुजवता येतील याबद्दल थोडक्यात आपले मत व्यक्त केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शंभू महाराज यांच्या जयघोषात व स्मारकास वंदन करून दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे स्वहित कलंबटे, निखिल चोरगे, अविनाश चोरगे , सागर फाटक,संतोष वरक, योगेश खरात ,संतोष शर्मा , रोहीत भोईटे, विनायक उभे, रमेश ढोकळे, सागर कल्याणकर, सचिन राठोड, प्रतिक साकळे, ओंकार झेंडे ,सार्थक गायकवाड, साहिल गायकवाड, कार्तिक जोशी , मंगेश नवघणे व इतर बाल शिलेदार उपस्थित होते.