पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वावर सर्वसामान्यांचा असलेला विश्वास व गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय संभव झाला – चंद्रकांत पाटील

3
पुणे : भारतीय जनता पक्षाने आज चार पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भारतीय जनता पक्षाने आज राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील कोथरुड मंडळाच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा केला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आज भारतीय जनता पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये घवघवीत यश संपादन केले. यानुषंगाने आज भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडळाच्या वतीने विजयाचा जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात सहभागी होऊन पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वावर सर्वसामान्यांचा असलेला विश्वास व गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय संभव झाला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे व भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन तसेच माय बाप जनतेचे मनःपूर्वक आभार!

Get real time updates directly on you device, subscribe now.