भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

पुणे : भाजपा पुणे जिल्हा उत्तरचे युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले , तसेच तीन राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या निर्विवाद वर्चस्वाबद्दल सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लाडू वाटून आनंद साजरा केला.

माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पक्ष यशस्वीरीत्या आगेकूच करत आहे. त्यामुळे २०२४ मधेही मोदीजींनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना केले.

यावेळी उत्तरचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, शिरुर-हवेली मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रदीपदादा कंद, क्रीडा प्रकोष्टचे प्रदेश संयोजक संदीपआप्पा भोंडवे, उत्तरच्या प्रभारी प्रा. निवेदिता एकबोटे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!